Awards

सौ.इशिका शेलार भारत गौरव पुरस्काराने सन्मानित..

दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल,मुंबई येथे करण्यात आला गौरव.. सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे.समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल,मुंबई येथे शानदार कार्यक्रमात IEA च्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात अभिनेता , दूरदर्शन निर्माता तसेच दिग्दर्शक मा.श्री.धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्मानिय व्यक्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

"राष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्कार"

25 मे 2020: सामाजिक कार्यात योगदान आणि उपलब्धी पाहता
सामाजिक कार्याच्या विविध प्रकल्पांसाठी मिळालेले विविध पुरस्कार, निवड आणि सन्मानित करण्यात आले
*ज्युरी ऑफ IEA बुक ऑफ रेकॉर्ड 

तहसील कार्यालय,खालापूरच्या वतीने सामजिक कार्याप्रती योगदान दिल्याबद्दल सहज सेवा फाऊंडेशनचा 26 जानेवारी 2024 रोजी तहसील कार्यालय,खालापूर येथे तहसीलदार आयुब तांबोळी साहेब व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

साप्ताहिक खालापूर वार्ताच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 मे 2024 रोजी सामाजीक कार्यात योगदान दिल्याबद्दल सहज सेवा फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला.

शीळफाटा येथील बापूजी मित्र मंडळाच्या वतीने रामनवमीच्या दिवशी 17 एप्रिल 2024 रोजी समाजाप्रती उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सहज सेवा फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला. सहज सेवा फाऊंडेशन च्यासा उपक्रमात कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन.. धन्यवाद.. सहज सेवा फाऊंडेशन

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचा गौरव...

सहज निसर्ग शाळेचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून जागतिक उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव.. 26 जानेवारी 2022 रोजी वीटभट्टी कामगारांच्या सहज निसर्ग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.टाटा स्टील लिमिटेडचे आस्थापण प्रमुख कपील मोदी व खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मानीय राज्यपाल यांनी संस्थेच्या सहज अन्नसेवा, सहज मनोरुग्ण स्वच्छता, सहज स्वर्गरथ, सहज वैद्यकिय उपकरणे, सहज स्वर्गपेटी,सहज सामुदायिक विवाह,सहज आपत्कालीन मदत व विविध कार्याची माहिती घेऊन उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या उपक्रमात व्हिजन फ्रेश यांनी सह आयोजकाची भूमिका बजावली आहे. वंचित व उपेक्षित घटकांना सहजसेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते. लोकसहभागातून उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या मदत कार्यात भरीव योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार अर्पण केल्याची भावना संस्थेच्या कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी यांनी व्यक्त केली आहे.

समाजाप्रती सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल तहसील कार्यालय,खालापूर यांच्या वतीने सहज सेवा फाऊंडेशनचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सन्मानचिन्ह देऊन सत्कार...

नागोठणे: रायगड पोलीस यांच्या वतीने आयोजित नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 रोजी दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी बालगंधर्व सभागृह, नागोठणे येथे पार पडला. कोरोना काळात अंतिमविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोणा झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून निःशुल्क जेवणाचे डबे पुरविताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्ग शाळा हि समाजासाठी मैलाचा दगड ठरलेला आहे. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून पार पडलेले 150 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका तसेच संस्थेच्या माध्यमातून 150 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे पाडण्यात प्रमुख भूमिका.
प.पु.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमीत्त 'गीतांजली प्रतिष्ठान" सामाजिक संस्था आयोजीत शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी ऋषीवन रिसॉर्ट,शिळफाटा येथे कार्यक्रमात सहज सेवा फाऊंडेशनचा समाजाप्रती उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

11 सप्टेंबर 2019:- अलिबाग येथे " रायगड भूषण" पुरस्काराने सन्मानित

Education Day Gratitude Award

Honoured as in specific field of social work on 12th October 2020 at Singapore By Commonwealth Vocational University ( Macaunga Hahake , Kingdom of Tongatapu ) Tonga) for outstanding contributions to social services.

National Sevaratna Award

Bhavana Multipurpose Organization, Nashik "* National Sevaratna Award *19 November 2017.

इशिका शेलार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार...

नवी मुंबई... पारस काव्य,कला,जनजागृती संस्थेतर्फे दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे. समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे.कोरोना काळात कोरोना मुळे मृत झालेल्या मृतांचे अंत्यविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून निशुल्क जेवणाचे डबे पुरवताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्ग शाळा ही समाजासाठी मैलाचा दगड ठरलेला आहे.याशिवाय संस्थेच्या माध्यमातून सलग 4 वर्ष पार पडलेले जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका बजावताना संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 6 वर्षांपासून पुरविण्यात येणारे दोन वेळचे निशुल्क भोजन व खोपोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्गरथ सेवा चालविण्यात अग्रेसर आहेत. लैंगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन, समाज जागृती मध्ये अग्रेसर आहेत. याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात. दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथील प्रसिध्द, ताज हॉटेल, येथे गौरव करण्यात आला. रायगड पोलीस यांच्या वतीने आयोजित 25 ऑक्टोबर 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा नवदुर्गा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इशिका शेलार यांचा शिवसेना (उबाठागट) कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत येथे मावळचे खासदार श्री.श्रीरंग बारणे,कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे,शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सन्मानाने सन्मान करण्यात आला.खालापूर तहसील,पंचायत समिती, खालापूर तसेच खोपोली नगरपरिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आल्या आहेत.दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे शानदार कार्यक्रमात IEA च्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात डायरेक्टर धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्मानिय व्यक्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या सर्व कार्याची नोंद घेवून रायगड पोलिस दलातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 च्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला व पोलीस महिला यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.समाजाचे ऋण मानून कार्यरत राहताना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सहज सेवा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा तसेच खोपोली पोलीस संचालित महिला दक्षता कमिटीच्या इशिका शेलार यांनी व्यक्त केला आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मान्यवरांनी भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

National Level Award

Award / Identity Card by the Applicant National level On 12 November 2017, in Delhi, there were 100 record holders from all over the world. The award was received

Outstanding Work

January 16, 2016 for the initiative November 29, 2017: Recognition and Award for Outstanding Work for the Society

Mahatma Phule Samaj Ratna Award

May 13 , 2018 : --"Mahatma Phule Samaj Ratna Award" was awarded. At the hands of Shri Jayakumar Gore, MLA of Khatav on the occasion of Mahatma Din on 13 th May 2018 Birthplace of Mahatma Jyotiba Phule, Katgun , Tehsil Khatav , District Satara .